सुखकर्ता दु : खहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ||
सर्वागी सुंदर उटि शेंदुराची ॥
कंठी झळके माळ मुक्ताफळांची || जय || १ ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन : कामना पुरती ।
रत्नखचित फरा तुज गौरीकुंमरा ||
चंदनाची उटी कुंकमकेशरा ॥
हिरेजडित मुकुट शोभतो बरा |
रूणझुणती नूपुरे चरणी घागरिया || जय || २ ||
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||
दास रामाचा वाट पाहे सदना ||
संकटी पावावे , निर्वाणी रक्षावे , सुरवर वंदना ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती || जय || ३ ||
Peoples also watch this
श्री गणेशाची आरती
श्री देवींच्या आरती
श्री शिव आरती
पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा खंडोबा आरती
श्रीरामाची आरती
श्रीपरशुरामाची आरती
श्री दत्ताची आरती
श्री सत्यनारायणाची आरती
श्री विष्णूच्या आरती
श्री संतांच्या आरती
श्री हनुमानाची आरती
इतर देवतांच्या आरती
मंत्र पुष्पांजली