गजानना श्री गणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥
मंगलमूर्ती श्री गणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥ १ ॥
सिंदूरचर्चित धवळे अंग ।
चंदन उटी खुलवी रंग ॥
बघतां मानस होते दंग ।
जीव जडला चरणी तुझिया ॥ २ ॥
गौरीतनया भालचंद्रा ।
देवा कृपेच्या तूं समुद्रा ॥
वरदविनायक करुणागारा ।
अवघी विघ्ने नेसी विलया ॥ ३ ॥
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .