शेषाचल अवतार तारक तू देवा ,
सुरवर मुनीवर भवे करिती तव सेवा ,
कमला रमना अससी अगणीत गुण सेवा ,
कमलाक्षा मज रानी सत्त्वर वर द्यावा ,
जयदेव जयदेव जय व्यंकटेशा
केवळ करुणासिंधू पुरविसी आशा ।।१ ।।
हे निज वैकुंठ म्हणुनी ध्यातो मी तुते ,
दाखविसी गुण सकळीक लोकाते ,
देखुनी तुझे स्वरूप सुख अद्भुत होतो ,
ध्याता तुजला श्रीपती दृढमानस होते ।। २ ।।
जयदेव जयदेव जय व्यंकटेशा
केवळ करुणासिंधू पुरविसी आशा ।।