आरती जेष्ठा-कनिष्ठा गौरीची | जय देवी जय देवी महालक्ष्मी

ll आरती जेष्ठा-कनिष्ठा गौरीची 1 ll



 जय देवी जय देवी महालक्ष्मी माता 


जेष्ठा कनिष्ठा गौरी अंबा जगत्राता II  धृ II



भाद्रपद शुद्ध सप्तमी आवाहन करिती, 


मनी जन आतूर होऊनी स्वागत तव करिती, 


अनुराधा नक्षत्री आगमन हे असती, 


तीन दिन उत्सवी मनी आनंदा भरती..


जय देवी जय देवी.



जय देवी जय देवी महालक्ष्मी माता 


जेष्ठा कनिष्ठा गौरी अंबा जगत्राता II १ II




दुजे दिनी प्रभात समयी पाहुणचार करिती, 


आरंभूनी तव पूजा फराळ अर्पिती, 


जेष्ठा नक्षत्री मग महापूजा करिती, 


नैवेद्य अर्पूनी गाऊ तव आरती..


जय देवी जय देवी.



जय देवी जय देवी महालक्ष्मी माता 


जेष्ठा कनिष्ठा गौरी अंबा जगत्राता II २ II




जेष्ठा कनिष्ठा गौरी आसनी स्थिर झाली ,


पिलवंडा सहित ही प्रेमे सुतविली, 


विविध पुष्पे वस्त्रमाळ हे भूषण, 


आघाडा दुर्वा ऐसे अन्य आभूषण. 


जय देवी जय देवी



जय देवी जय देवी महालक्ष्मी माता 


जेष्ठा कनिष्ठा गौरी अंबा जगत्राता II ३ II




तिसरे दिवशी मुळ नक्षत्री पूजा, 


खिर पोळी नैवेद्य अर्पूया गिरीजा,

 

गाऊनी आरती करूनी निर्माल्य गाठी, 


लक्ष्मी रूपे पोवती घालिती मग कंठी..


जय देवी जय देवी.



जय देवी जय देवी महालक्ष्मी माता 


जेष्ठा कनिष्ठा गौरी अंबा जगत्राता  II  ४ II




ऐसा उत्सव जेथे होतो प्रति वर्षी, 


परिवारासहित ही पूजा अतिहर्षी, 


सुवासिनी मग कुंकुमार्चन करिती , 


कथितो संजय  सुखाचे योजन हेची..


जय देवी जय देवी.



जय देवी जय देवी महालक्ष्मी माता 


जेष्ठा कनिष्ठा गौरी अंबा जगत्राता  II ५ II



ll आरती जेष्ठा-कनिष्ठा गौरीची 2 ll



जय देवी जय देवी महालक्ष्मी माते

सुख समृद्धी घेवूनी यावे मम गृहाते ॥धु।

जय देवी ...


जेष्ठा कनिष्ठा रुपे भाद्रपद मासी

अनुराधा नक्षत्रावर येई माहेराशी

लेवूनी महावस्त्र जरभरीत खाशी

कुंकूम पावले शोभे माझे अंगणाशी ॥१॥

जय देवी...


जेष्ठ शुभ नक्षत्रे पावन पर्वासी

षोडश शाक नैवेद्य फुलोरा तुजशी

सौभाग्य रक्षणे अर्पीले पोवत्याशी

मुखी तांबुले आली शोभा वदनाशी ॥२॥

जय देवी ...


मुळ नक्षत्र जरी काळ गणनेशी

परी वास तुझा राहो आम्हासी

सुखदायि वरदायि महालक्ष्मी ऐसी

विष्णुकमलसुत सदैव नत त्या पदासी ॥३॥

जय देवी जय देवी ...






थोडे नवीन जरा जुने