जय देवी जय देवी जय योगेश्वरी अंबे ।
आरती करितो भावे तुजला जगदंबे ॥ धृ ॥
कोकण प्रांती अंबे घेऊनी अवतार ।
भक्ती मार्गा जगती वाढविले फार ।
जयंति नगरी मारून दंतासुर घोर ।
भक्ता मनोप्सित देण्या वससी ते नगर ॥ १ ॥
योगाईऽ तव ख्याती ब्रह्मांडी ज्ञात ।
शेषही गाता शिणला तव गुण अगणित ।
ब्रह्मा विष्णू सदाशिव निशिदिन तुज ध्यात ।
इन्द्रादिक ते सुरवर तवपद सेवीत ॥ २ ॥
अंबानगर निवासिनी सर्वेश्वर जननी ।
दानव दुष्ट विमर्दिनी स्वभक्त सुखकारिणी ।
दासा रक्षण करणी पातक संहरणी ।
दास हरी तव चरणी नत हो दिन रजनी ॥ ३ ॥
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .