साष्टांग नमन हे माझें गौरीपुत्रा विनायका | Ganapati Stotra

साष्टांग नमन हे माझें गौरीपुत्रा विनायका 
भक्तीने स्मरतां नित्य आयु: कामार्थ साधती ।। १ ।। 

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें | 
तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र तें  ।। २ ।। 

पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव तें । 
सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ।।३ ।।
 
नव श्री भालचंद्र दहावें श्रीविनयक । 
अकरावें गणपति बारावें श्रीगजानन  ।। ४ ।। 

देवनावें अशी बारा तीन संध्या म्हणे नर । 
विघ्नभीति नसे त्याला प्रभो तू  सर्वसिद्धि दे ।।५ ।। 

विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन 
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गि ।।६ ।। 

जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ । 
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ।।७ ।। 

नारदांनी रचिलेले झालें संपुर्ण स्तोत्र हें । 
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिलें ।। ८ ।।
थोडे नवीन जरा जुने