सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली
ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली ।।
सोन्याच्या पावलाने ..
कुंकवाने घातला सडा | मुखी तांबुल विडा
हाती शोभे हिरवा चुडा । दिला प्रसादाचा पेढा ।।१।।
सोन्याच्या पावलाने ..
नेत्रांच्या लावल्या वाती । पंच प्राणाच्या ज्योती
आरती भक्त गाती । तेथे नाविण्याच्या ज्योती ।।२।।
सोन्याच्या पावलाने ...
भावभक्तीच्या केल्या माळा | घातल्या महालक्ष्मीच्या गळा
पायी वाजे पुंगरमाळा | केला हा सुख सोहळा ।।३।।
सोन्याच्या पावलाने ...
रेणुकेची भरली ओटी । लावली चंदन ऊटी
किर्ती तिची जगजेठी । झाली दर्शना दाटी ।।४।।
सोन्याच्या पावलाने ...
👇लोक हे ही पाहतात ( अवश्य पहाच ) 👇
( Stotra, Arati, Mantra, Articles, PDF Library and more...)