श्री गजानना जय गजानना Shri Gajānana Jaya Gajānana Pārvatīchyā sukumāra re

श्री गजानना जय गजानना
शिव पार्वतीच्या सुकुमार रे ।
तुला मोदक आवडे फार रे ( २ )

सुंदर दिसतो । सिंहासनी बसतो ( २ )
शेंदुर चर्चितो लाल रे तुला ।। १ ।।

दुर्वा हराळी बहु प्रेमाची ( २ )
मोदक भक्षितो फार रे तुला ।। २ ।।

अग्र पुजेचा तु अधिकारी ( २ )
करी विघ्नांचा संहार रे तुला ।। ३ ।।

भाद्रपदाच्या शुद्ध चतुर्थिला ( २ )
दरवर्षी येणार रे तुला ।। ४ ।।

एका जनार्दनी म्हणे रमापती ( २ )
सेवक गुंफीतो हार रे तुला ।
तुला मोदक आवडे फार रे .. तुला ।। ५ ।।

थोडे नवीन जरा जुने