जय देवी अंबाबाई , परशुरामाचे आई | Jay Devi Ambabai Parashuramachi देवीची आरती

जय देवी अंबाबाई , परशुरामाचे आई । 

आरती ओवाळीन , माझे रेणुका आई ।। 

जय देवी अंबाबाई 


मातापुरी तुझा वास | भक्त धरीती ध्यास || 

संकट समयास । धाव घेई तू खास || १ ।। 

जय देवी अंबाबाई 


काय वर्गु तुझे गुण | शेष थकलासे जाण ।। 

अज्ञान हरी पायी । अंबे देई दर्शन ।। २ ।।

जय देवी अंबाबाई 

थोडे नवीन जरा जुने