पुष्पांजली ही तुम्हा अर्पितो रामचंद्र सदया | पारनेरकर महाराज

पुष्पांजली ही तुम्हा अर्पितो रामचंद्र सदया । 

तव पदी वंदन करण्या स्फूर्ति द्यावी या हृदया ।। धृ ।। 


भाविक जन हे आनंदाने नमिती तव पायी । 

धन्य मानिती ते आपुल्याला संशय मुळी नाही ।।


श्री रामचंद्रगुरू पारनेरकर अवतरले जगी या । 

उद्धरण्याला भक्तजनांना हरूनी पापभया ।।


दीन दयाळा आम्ही लेकरे शरण तुम्हा आलो । 

भक्तिप्रेमे पुष्पांजली ही वाहण्यास सजलो ।।


पुष्पांजली ही तुम्हा अर्पितो रामचंद्र सदया | 

तवपदी वंदन करण्या स्फूर्ति द्यावी या हृदया ।।
थोडे नवीन जरा जुने