जय जय भवानी , मनरमणी ,
मातापुरवासीनी | चौदाभुवनांची स्वामिनी ।
महिषासुरमार्दिनी ।।जय ।। धृ ।।
नेसुनि पाटाव , पिवळा , हार शोभे गळा ।।
हाती घेऊनिया त्रिशुळा , भाळी कुंकुम टीळा || १ ||
अंगी लेवुनिया काचोळी , वर मोत्यांची जाळी ।
हृदयी शोभतसे , पदकमळी , कंठी हे गरसोळी || २ ||
पायी घागरिया , घुळघुळ , नाकी मुक्ताफळ |
माथां केश हे , कुरळ नयनींहो काजळ || ३ ||
सिंहावरी तू बैसून , मारिसी दानवगण ||
तुजला विनवितो , निशिदीन , गोसावीनंदन || ४ ||