आरती साईबाबा | सौख्य दातार जीवा साईबाबाची आरती

आरती साईबाबा | सौख्य दातार जीवा । 
चरण रजतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती ॥ 
जाळुनिया अनंग सस्वरूपी राहे दंग | 
मुमुक्षजना दावी निज डोळा श्रीरंग || 
आरती साईबाबा ॥

 जयामनी जैसा भाव , तया तैसा अनुभव | 
दावीसी दयाधना ऐसा तुझा यो भाव || 
आरती साईबाबा || 

तुमचे नाम घेता , हरे संस्कृती व्यथा । 
अगाध तव करणी , मार्ग दावीसी अनाथा || 
आरती साईबाबा || 

कलियुगी अवतार , सगुणब्रम्ह साचार । 
अवतीर्ण झालासी , स्वामी दत्त दिगंबर || 
आरती साईबाबा || 

आठादिवसा गुरूवारी , भक्त करीती वारी । 
प्रभूपद पहावया , भवभरा निवारी || 
आरती साईबाबा || 

माझनीजदव्य ठेवा , तव चरणरज सेवा । 
मागणे हेची आता , तुम्हा देवाधी देवा || 
आरती साईबाबा || 

इच्छित दिन चातक , निर्मळ तोय निज सुख । 
पाजावे माधवा या सांभाळ आपुली भाक || 
आरती साईबाबा ||
थोडे नवीन जरा जुने