जय जय श्री शनिदेवा शनि देवाची आरती shanidev aarati

जय जय श्री शनिदेवा ।
पद्मकर शिरी ठेवा ।
आरती ओवाळितो ।
मनोभावे करुनी सेवा ॥ धृ ॥

सूर्यसुता शनिमूर्ती ।
तुझी अगाध कीर्ती ॥
एकमुखे काय वर्णू ।
शेषा न चले स्फूर्ती ॥ १ ॥

नवग्रहांमाजी श्रेष्ठ ।
पराक्रम थोर तुझा ॥
ज्यावरी कृपा करिशी ।
होय रंकाचा राजा ॥ २ ॥

विक्रमासारिखा हो ।
शककर्ता पुण्यराशी ।
गर्व धरिता शिक्षा केली ।
बहुत छळियेले त्यासी ॥ ३ ॥

शंकराच्या वरदाने ।
गर्व रावणे केला ॥
साडेसाती येता त्यासी ।
समूळ नाशासी नेला ॥ ४ ॥

प्रत्यक्ष गुरुनाथा ।
चमत्कार दावियेला ॥
नेऊनि शूळापाशी ।
पुन्हा सन्मान केला ॥ ५ ॥

ऐसे गुण किती गाऊ ।
धणी न पुरे गाता ॥
कृपा करी दीनावरी ।
महाराजा समर्था ॥ ६ ॥

दोन्ही कर जोडोनिया ।
रखमा लीन सदा पायी ॥
प्रसाद हाचि मागे ।
उदयकाळ सौख्य दावी ॥ ७ ॥

जय जय श्री शनिदेवा ।
पद्मकर शिरी ठेवा ।
आरती ओवाळितो ।
मनोभावे करुनी सेवा ॥

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने