नमितो तुजला हिरादेवी | Namito Tujala Hiradevi | हिरादेवी आईची

×

📿 सेवा बुकिंग / चौकशी फॉर्म

नमितो तुजला हिरादेवी ठेवितो चरणी माथा ,

 आई ठेवितो चरणी माथा । 

अजाण आम्ही तुझी बालके तू आमची माता ,

आई तू आमची माता।।धृ ।। 


मन इच्छिले ते पावले दारी तुझ्या येऊनी , 

आई दारी तुझ्या येऊनी । 

देई आशिर्वाद आम्हा सर्वा प्रसन्न होऊनी , 

आई सर्वा प्रसन्न होऊनी ।। 

मन गुंतले तुझ्याच पायी भान नसे आम्हा , 

आई भान नसे आम्हा ।। 

अजाण आम्ही तुझी बालके ... || १ || 


टाळ , मृदंग , ढोल बाजुनी गान तुझे गातो , 

आई गान तुझे गातो । 

तुझिया नामी रंगुनिया आम्हा आंनद होतो , 

आई आम्हा आंनद होतो ।। 

शब्द बापुडे असे तरी तू घे मानुनी माता , 

आई तू घे मानुनी माता ।। 

अजाण आम्ही तुझी बालके ... ।।२ ।। 


मंगळवारी आरतीस मन प्रसन्न होते , 

आई मन प्रसन्न होते । 

लहान थोर सारी जनता मंदिरात जमते , 

आई मंदिरात जमते ।। 

भाव त्याचा जानूनी त्यांना इच्छित वर द्यावा , 

आई इच्छित वर द्यावा ।। 

अजाण आम्ही तुझी बालके ... ।।३ ।।

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने