उंदरावर बैसोनी दुडदूडां येसी | गणपतीची आरती

उंदरावर बैसोनी दुडदूडां येसी ।
हाती मोदक लाडू घेउनियां खासी ॥
भक्तांचे संकटी धावुनियां पावसी ।
दास विनविती तुझिया चरणांसी ॥ १ ॥

जय देव जय देव जय गणराया ।
सकळ देवांआधीं तूं देव माझा ॥ धृ ॥

भाद्रपदमासी होसी तूं भोळा ।
आरक्त पुष्पांच्या घालुनियां माळा ॥
कपाळी लावुनि कस्तुरी टिळा ।
तेणें तूं दिससी सुंदर सावळा ॥ २ ॥

प्रदोषांचे दिवशीं चंद्र शापिला ।
समयीं देव मोठा आकांत केला ॥
इंदु येवोनी चरणी लागला ।
श्रीरामा बहुत शाप दिधला ॥ ३ ॥

पार्वतीच्या सुता तूं ये गणनाथा ।
नेत्र शिणले तुझी वाट पाहता ॥
किती अंत पाहसी बा विघ्नहर्ता ।
मजला बुद्धी देई तूं गणनाथा ॥ ४ ॥

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने