जय देवी जय देवी जय माय तुळशी | श्रीतुळशीची आरती

॥ तुळशीची आरती ॥

जय देवी जय देवी जय माय तुळशी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळसी ॥ धृ ॥

ब्रह्मा केवळ मुळी मध्ये तो शौरी ।
अग्री शंकर तीर्थे शाखापरिवारी ।
सेवा करिती भावे सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रे पापें हरती निर्धारी ॥
जय देवी जय देवी जय माय तुळशी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळसी ॥ १ ॥

शीतळ छाया भूतळव्यापक तू कैसी ।
मंजिरीची बहुआवड कमळारमणासी ।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ॥
जय देवी जय देवी जय माय तुळशी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळसी ॥ २ ॥

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी ।
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
गोसावी सुत विनवी मजला तू तारी ॥
जय देवी जय देवी जय माय तुळशी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळसी ॥ ३ ॥

थोडे नवीन जरा जुने