आरती रामदासा | भक्त श्री रामदास स्वामींची आरती

×

📿 सेवा बुकिंग / चौकशी फॉर्म

आरती रामदासा | भक्त विरक्त ईशा | 
उगवला ज्ञानसूर्य || उजळोनी प्रकाशा || धृ ||
आरती रामदासा ||

 साक्षात शंकराचा | अवतार मारुती | 
कलिमाजी तेचि झाली | रामदासाची मूर्ती || १ || 
आरती रामदासा ||

वीसही दशकांचा | दासबोध ग्रंथ केला | 
जडजीवां उद्धरिले नृप शिवासी तारीले || २ ||
आरती रामदासा ||

 ब्रम्हचर्य व्रत ज्याचे । रामरूप सृष्टी पाहे | 
कल्याण तिही लोकी | समर्थ सद्गुरुपायी || ३ |
आरती रामदासा ||

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने