वाहु सुमने तवपदकमली पुष्पांजली

वाहु सुमने तवपदकमली , प्रणाम करू या हो |
 
आत्म सुखाची हिच पाऊले हृदयी धरुया हो ।। 


मानुनी घ्यावी सेवा आमुची , अल्प तरी सारी ।

सद्गुरुराया प्रसन्न व्हावे , भक्ताला तारी ।। 


भक्त वत्सला तुझ्या कृपेची छाया दे राया ।

त्रिभुवनी नाही तुजविण आम्हा , कुणी रक्षाया ।। 


बेल फूले ही हाती घेऊनी , मंजूळ तुळसीची ।

जाई जुईची वाहु सुमने , पुष्प गुलाबाची ।।

 
बहुविध सुमने चरणी वाहु , सुवास दरवळला |

नित्य सुखाची द्यावी गोडी , अजाण भक्ताला || 


शक्ती बुद्धी दे , मनः शांती दे | तुजसी वंदाया ।

कृपा प्रसादे तु जगदिशा , उद्धरसी काया ।।




थोडे नवीन जरा जुने