उंदरावर बैसोनी दुडदूडां येसी ।
हाती मोदक लाडू घेउनियां खासी ||
भक्तांचे संकटी धावुनियां पावसी ।
दास विनवीती तुझिया चरणांसी ।।
जय देव जय देव जय गणराया
सकळ देवांआधीं तूं देव माझा
।। जय देव ।। १ ।।
भादपदमासी होसी तूं भोळा |
आरक्त पुष्पांच्या घालुनियां माळा ||
कपाळी लावुनि कस्तुरी टिळा |
तेणें तूं दिससी सुंदर सावळा ।।
जय देव ।। २ ।।
प्रदोषांचे दिवशीं चंद्र शापिला ।
समयीं देव मोठा आकांत केला |
इंदु येवोनी चरणी लागला |
श्रीरामा बहुत शाप दिधला ।।
जय ।। ३ ।।
पार्वतीच्या सूता तूं ये गणनाथा |
नेत्र शिणले तुझी वाट पाहतां ।।
किती अंत पाहसी बा विघ्नहर्ता ।
मजला बुध्दी देई तूं गणनाथा ।।
जय ।। ४ ।।
Peoples also watch this
श्री गणेशाची आरती
श्री देवींच्या आरती
श्री शिव आरती
पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा खंडोबा आरती
श्रीरामाची आरती
श्रीपरशुरामाची आरती
श्री दत्ताची आरती
श्री सत्यनारायणाची आरती
श्री विष्णूच्या आरती
श्री संतांच्या आरती
श्री हनुमानाची आरती
इतर देवतांच्या आरती
मंत्र पुष्पांजली