जय जय दीन दयाळा सखया परशुधर देवा | परशुरामाची आरती

जय जय दीन दयाळा सखया परशुधर देवा ।
हीन दीन मी आरती करितो घ्यावी मम सेवा ॥ धृ ॥

त्रेतायुगी जन्मुनी प्रभुजी मुनीस तोषविलें ।
चतुर्वेद षट्शास्त्रे शिकुनी भृगुकुल भूषविले ॥
महान तप आचरुनी शिवासी प्रसन्न त्वां केलें ।
शस्त्र अस्त्र विद्येला भार्गवा, आत्मसात केलें ॥ १ ॥
जय जय...

जमदग्नीची धेनु न्यावया सहस्त्रार्जुन आला ।
धेनु जाईना म्हणुनी तयाने जमदग्नी वधिला ॥
पतिसी रक्षण्या रेणुकेने प्रतिबंध केला ।
रायें एकवीस बाणे घायाळ केले रेणुकेला ॥ २ ॥
जय जय...

राजमदाने राये ऋषींचे आश्रम जाळियेले ।
धेनू ब्राह्मण आणि अबला यांसी त्रासिले ॥
याकारणे देवा, सहावे अवतारा धरिलें ।
परशु हाती धारण करुनी रायासी वधिलें ॥ ३ ॥
जय जय दीन दयाळा...

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने