भक्तपालिके मन रंजीके | Bhaktapalike man ranjike | आरती कालीकेची देवीची आरती

भक्तपालिके मन रंजीके, कल्पकते देवी ।
आरती ओवाळू तुज कालीके जय अंबाबाई ॥ धृ ॥

दशवदन दश हात ते । संकटाशी उभी राही ।
दाही हातामध्ये आयुधे असूनी । भक्ता रक्षिसी ॥ १ ॥

लळलळ जिव्हा वदन भीषण । क्रोधायमान दिससी ।
भक्ता कारिण हास्यवदन । कवटाळून घेसी ॥ २ ॥

लाल वस्त्र मौक्तिक भूषण । रम्य मान दिससी ।
कृष्णतनय हरि शरण । रेणूका मातेशी ॥ ३ ॥

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने