जयजय सदगुरु स्वामी समर्था ।
आरती करु गुरुवर्या रे |
अघाध महिमा तव चरणाचा |
वर्णाया मती देया रे ।।धृ .।।
अक्कलकोटी वास करुनिया ।
दाविली अघटित चर्या रे ।
लीलापाशे बद्ध करुनिया ।
तोडीले भवभया रे ।।१ ।।
यवने पुशिले स्वामी कहाँ है ? ।
अक्कलकोटी पहा रे ।
समाधी सुख ते भोगुनी बोले ।
धन्य स्वामी वर्या रे ।।२ ।।
जानसी मनिचे सर्व समर्था ।
विनवू किती भवहरारे ।
इतुके देई दीन दयाळा ।
नच तव पद अंतरा रे || ३