हेरंभ शिवकुल दिपका Herāmbha Śivakula Dipakā

हेरंब शिवकुल दीपका ।
तुज आरती गणनायका ॥ धृ ॥

सिंदुरासुर मर्दुनी ।
सुरा सोडिले पाशातुन ॥
देवगण तुज वंदुनी ।
स्वस्थानी गेले हर्षुनी ॥ १ ॥

दर्शने तव श्रीपती ।
मनःकामना सिद्धीस जाती ॥
स्वयंप्रकाशित तू गजवदना ।
निरांजन दीप काय तुला ॥ २ ॥

मंगलारती गुंफुनी ।
ही आरती द्वारकासुत गातो ॥
आरती ओवाळीतो ।
आरती ओवाळीतो ॥ ३ ॥

हेरंब शिवकुल दीपका ।
तुज आरती गणनायका ॥

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने