तु सुखकर्ता तु दुःखकर्ता | श्री गणेश भजन

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
विघ्नविनाशक मोरया ।
संकटी रक्षी शरण तुला मी
गणपती बाप्पा मोरया ॥

मंगलमूर्ती तू गणनायक
वक्रतुंड तू सिद्धिविनायक ।
तुझिया दारी आज पातलो
देई चित्त मज घ्याया ॥ १ ॥

तू सकलांचा भाग्यविधाता ।
तू विद्येचा स्वामीदाता ।
ज्ञानदीप उजळुनी आमुचा
निमवी नैराश्याला ॥ २ ॥

तू माता तू पिता जगी या
ज्ञाता तू सर्वस्व जगी या ।
पामर मी स्वर उणे भासती
तुझी आरती गाया ॥ ३ ॥

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने