आरतीज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।
सेवती साधुसंत ,मनु वेधळा माझा । आरतीज्ञानराजा || १ ||
लोपळे ज्ञान जगी । हित नेणती कोणी ।
अवतार पांडूरंग , नाम ठेविले ज्ञानी । आरतीज्ञानराजा || २ ||
कनकाचे ताट करी । उभ्या गोपिका नारी ।
नारदतुंबरो हो , साम गायन करी | आरतीज्ञानराजा || ३ ||
प्रकट गृह्य बोले । विश्व ब्रम्हाची केले ।
रामजनार्दनी , चरणी मस्तक ठेविले । आरती ... ॥३ ॥