जय जय मुंजिया नारसीया ।
उत्तम अश्वत्थ छाया ।
घुळ घुळ घागरीया वाजतीया ।
लागल तुमच्या पाया ॥ १ ॥
जय जय मुंजिया...
शेंदूर सर्वांगी शोभतो ।
उदीचा परिमळ ।
वस्त्रभूषण मिरवितो ।
भक्ताला प्रसन्न होतो ॥ २ ॥
जय जय मुंजिया...
भूत झोटिंग खैस ।
करतील जना त्रास ।
तुमच्या भजनाचा उल्हास ।
तोडील त्यांचा पाश ॥ ३ ॥
जय जय मुंजिया...
ऐसा कलियुगी मल्हारी ।
मुंज्या परोपकारी ।
नरहरी कुमराचा
कैवारी नाना नाटकधारी ॥ ४ ॥
जय जय मुंजिया...
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .