पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा | आरती खंडेरायाची (खंडोबाची

पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा | 

खंडामंडित दंडित दानव अवलीळा ।।
 
मणिमल्ला मर्दुनियां जो धुसरपिवळा । 

हिरे कंकण बाशिंगे सुमनांच्या माळा || १ || 


जय देव जय देव जय शिव मल्हारी हो राजा मल्हारी । 

वारी दुर्जन असुरां भवदुस्तर तारी ।।धृ .।। 


सुरवर संवर वर दे मजलागीं देवा | 

नाना नामें गाईन ही तुमची सेवा ।। 

अघटित गुण गावया वाटतसे हेवा | 

फणिवर शिणला तेथें नर पामर केवा || २ || 


रघुवरस्मरणीं शंकर हृदयी निवाला । 

तो हा मल्लांतक अवतार झाला || 

यालागी आवडी भावें वर्णीला । 

रामी रामदासा जिवलग भेटला || ३ ||
थोडे नवीन जरा जुने