भूकन्या अनन्न्या मुनिमान्य सीता ।
खेचर वनचर फणिवर भरता निज भ्राता ।
दशरथ नृपनायक धन्य तो पिता।।1 ।।
जयदेव जयदेव जय रघुकुल टिळका ।
आरती ओवाळु त्रिभुवन नायका जयदेव जयदेव ।
आचार्या गुरूवर्या कार्याचे फळ।
रविकुळ मंडन खंडन संसार मूळ ।
सुरवर मुनिवर किन्नर ध्याति सकळ।
धन्य तो निजदास भक्तप्रेमळ ।।2 ।।
जयदेव जयदेव जय रघुकुल टिळका ।
आरती ओवाळु त्रिभुवन नायका जयदेव जयदेव ।।
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .