जय जय सत् चित् स्वरुपा स्वामी | श्री गजानन महाराजांची आरती

 जय जय सत् चित् स्वरुपा स्वामी गणराया 
अवतरलासी भूवर जड - मूढ ताराया ।।
 जयदेव जयदेव।।ध्रु .।। 

निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी । 
स्थिरचर व्यापुन उरलें जें या जगतासी ।
 ते तूं तत्व खरोखर निःसंशय अससी | 
लीलामात्रे धरिले मानवदेहासी ।। 
जयदेव जयदेव || १ || 

होऊ न देसी त्याची जाणिव तूं कवणा । 
करुनि गणगण गणांत बोते या भजना | 
धाता हरीहर गुरुवर तूचि सुखसदना ।
 जिकडे पहावे तिकडे तूं दिससी नयना 
|| जयदेव जयदेव || २ || 

लीला अनंत केल्या बंकटसदनास | 
पेटविलें त्या अग्नीवाचुनि चिलमेस | 
क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस । 
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश |
 जयदेव जयदेव || ३ || 

व्याधी वारुन केले कैकां संपन्न || 
करविले भक्तालांगी विठ्ठल दर्शन |
 भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण | 
स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ।।
 जयदेव जयदेव || ४ ||
थोडे नवीन जरा जुने