आरती एकनाथा । महाराजा समर्था । एकनाथ महाराजांची आरती

आरती एकनाथा । महाराजा समर्था । 
त्रिभुवनी तूंचि थोर | जगदगुरू जगन्नाथा || ध्रु .॥ 

एकनाथ नाम सार । वेदशास्त्रांचे गूज | 
संसारदु : ख नाम | महामंत्राचे बीज | आरती || १ || 

एकनाथ नाम घेतां । सुख वाटले चित्ता । 
अनंत गोपाळदासा | धणी न पुरे गातां |आरती || २ ||
थोडे नवीन जरा जुने