आरती जगदंबे । तुज अंबे ।
तारक विश्वकुटुंबे । जयजय जगदंबे ॥ धृ ॥
प्रथम मुळारंभा । घट शोभा ।
तोरण मखरस्तंभा । आरती जगदंबे ॥ १ ॥
दुसरी ही पूजा । तुज ओझा ।
ओवाळीन सुख काझा । आरती जगदंबे ॥ २ ॥
लोकत्रय छंदा । आनंदा ।
ध्यासी मानसवृंदा । आरती जगदंबे ॥ ३ ॥
चवथी ही पूजा । तव तेजा ।
नवरत्नांची शेजा । आरती जगदंबे ॥ ४ ॥
पंचारती पाही । तुज आई ।
सुंदर अंबाबाई । आरती जगदंबे ॥ ५ ॥
षट्गुण संपन्न । अन्नपूर्णा ।
देसी मंगल सदना । आरती जगदंबे ॥ ६ ॥
सप्तेश्वर मेळी । रसभाळी ।
नाना वाद्यरसाळी । आरती जगदंबे ॥ ७ ॥
भाव बळे आता । घनदाटे ।
उदारमुळं पीठे । आरती जगदंबे ॥ ८ ॥
नवदिनी नवरात्र । शिवस्तोत्र ।
स्थापून मंगल मंत्र । आरती जगदंबे ॥ ९ ॥
दास तुझा ध्यायी । अंबा ही ।
कुलदैवत मूळमाही । आरती जगदंबे ॥ १० ॥
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .