सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥ १ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनःकामना पुरती ॥ धृ ॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥ २ ॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ॥ ३ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनःकामना पुरती ॥
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .