धूप दीप झाला आता कापूर आरती ।
(गणेशा कापूर आरती) ॥
रत्नजडित सिंहासनी... २ मंगलमूर्ती ॥ धृ ॥
कर्पूरासम निर्मल माझे मानस राहू दे ॥
(गणेशा मानस राहू दे) ॥
कर्पूरासम भावभक्तीचा... २ सुगंध वाहू दे ॥
धूप दीप...
कापुराची लावून ज्योती पाहीन तव मूर्ती ॥
(गणेशा पाहीन तव मूर्ती) ॥
नयनी साठवू ही मंगलमूर्ती ॥ २ ॥
धूप दीप...
ज्ञान कळेना ध्यान कळेना, कळेना काही ॥
(गणेशा कळेना काही) ॥
शब्दरूपी गुंफूनी माळा... २ वाहतसे पायी ॥ ३ ॥
धूप दीप...
नेत्री ध्यान मुखी नाम, हृदयी तव मूर्ती ॥
(गणेशा हृदयी तव मूर्ती) ॥
भावभक्तीने केली देवा... २ कापूर आरती ॥ ४ ॥
धूप दीप...
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .