पंचफना शिखरी देव श्रीहरि | श्री व्यंकटेशाची आरती

पंचफना शिखरी देव श्रीहरि । 

संन्मुख हनुमंत उभा से द्वारी । 

गरुड सेवा करी चरणी निरंतरी । 

कोटी तिर्थ राणा तिरुमलगिरीवरी || १ || 


जयदेव जयदेव जय व्यंकटरमणा जय लक्ष्मी रमणा 

आरती ओवाळू , भावे ओवाळू तव दिनोद्धरणा || धृ .।। 


जय विजय दोन्ही द्वारपाल द्वारी ।

 देव एक म्हणऊनी दास्यत्व करी । 

चर्तुभुज मूर्ती दिसते साजीरी । 

दिसते गोजिरी । शेषाद्रीचा राणा

 व्यंकटगिरीचा राणा तिरुमलगिरीवरी || २ || जय .. 


गिरीच्या शिखरी तुमचा अवतार । 

ब्रह्मादिका न कळे तव तुमचा पार । 

साठ खंड्या भोजन | ताट विस्तार | 

प्रसाद लाभला वाद्यांचा गजर ।। ३ ।। 


तेथील मंगल मुहूर्त । झाला उत्सव । 

बरवा उत्साह । प्रसन्न झाला समया देवाधीदेव । 

विप्र कोणी चरणी मागतसे ठाव । तयासी प्रसन्न | 

भक्तासी प्रसन्न व्यंकटगिरीराव || ३ || 


जयदेव जयदेव जय व्यंकटरमणा जय लक्ष्मीरमणा । 

आरती ओवाळू , भावार्थी ओवाळु लागतसे चरणा ।।धृ ।।
थोडे नवीन जरा जुने