श्रीदेवी रेणुके । वंदन करितों तुजला ।
दे सन्मती आतां सेवा करण्या मजला || धृ ||
किती दैत्य मारुनी सुरवर तूं तोषविले ।
अवतार घेऊनी भूधर तूं रक्षीयले || चाल ||
प्रार्थना करी मी माते तव चरणाला ।
सन्मती देऊनी रक्षी दीन जनांला ||
श्रीदेवी रेणुके । वंदन करितों तुजला ।
दे सन्मती आतां सेवा करण्या मजला ||१||
तसे शुंभ निशुंभा मोक्षपदां त्वां नेलें ।
एकवीरा म्हणवुनी भृगुकुल भूषविलें ॥
पाठीशी राहुनी रक्षी परशुरामाला ।
तशि झणी प्रगटुनी तारी भारताला || चाल ||
करूं किती अतां मी धांवा चंडिके ।
झणिं पाव भवानी माते भाविके ।।
तव प्रसन्न करण्या करितों मी पूजेला ।
ती गोड मानुनी रक्षी बालकाला ||
श्रीदेवी रेणुके । वंदन करितों तुजला ।
दे सन्मती आतां सेवा करण्या मजला ||२||
टीप :- आपल्या परिचयातील एखादी आरती येथे WEBSITE वर उपलब्ध नसल्यास तसेच आपल्या जवळील कोणती हि आरती येथे POST करायची असल्यास whatsapp वर मेसज करावा.