गणराज पार्वती नंदना | गणपतीची आरती

गणराज पार्वती नंदना ।
तुज आरती श्री गजानना ॥ धृ ॥

मातापिता गुरु तू आम्हा
रक्षी सदैव मनोरमा ॥
पुरविसी आमुच्या मन कामना ।
तुज आरती श्री गजानना ॥ १ ॥

अज्ञानी या निजबाळका
द्यावी सुमती श्री विनायका ॥
रत होऊनी आम्ही तव चरणा ।
तुज आरती श्री गजानना ॥ २ ॥

माधवसुत करी शंकर कुमरा ।
प्रेमभरे आरती तुजला ।
ऐसा तू गणेश गणाधिगणा ॥
तुज आरती श्री गजानना ॥ ३ ॥

सुमंगला सकळा गुणा
तुज आरती श्री गजानना ॥
गणराज पार्वती नंदना
तुज आरती श्री गजानना ॥ ४ ॥

गणराज पार्वती नंदना ।
तुज आरती श्री गजानना...

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने