आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा | तुकाराम महाराजांची आरती

आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा | 
सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ || 

राघवें सागरांत |  पाषाण तारिले |
तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकी रक्षिले | 
आरती तुकारामा || १ ||

तुकितां तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें | 
म्हणोनी रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें || 
आरती तुकारामा || २ ||

संबंधित इतर पोस्ट्स 👇

🪙
विशेष ज्योतिष उपाय
समृद्धी (Prosperity), बचत (Savings) आणि गुंतवणुकीसाठी (Investment) विशेष मार्गदर्शन
थोडे नवीन जरा जुने