जय जय जय मयुरेश्वरा ।
पंचारती ओवाळू हरा (२) ।
जय जय जय मयुरेश्वरा ॥ धृ ॥
शोभती सुंदर कमलासन हे ।
रत्नजडीत शिरी मुकुट विराजे ॥
पायी घागरी रुणझुण वाजे ।
श्रीधरा करुणाकरा ॥ १ ॥
शेंदूर चर्चित केशरी टिळा ।
कंठी झळकती मौक्तिक माळा ॥
कटी कसून पीतांबर पिवळा ।
पाशांकुशधर हस्त फणिवरा ॥ २ ॥
मंगलमूर्ती पार्वती बाळा ।
सुरवर मुनिजन पूजती तुजला ॥
विघ्न निवारी श्रमवी सकला ।
कमलनयन हे मनोहरा ॥ ३ ॥
धाव पाव रे गौरीनंदना ।
आलिंगुनी तुज करी रे वंदना ॥
पतित मी पापी शमवी सकला ।
श्रमलो दमलो या संसारा ॥ ४ ॥
करुणास्तव हे परिसुनी कानी ।
प्रगट झाली जगत्जननी ॥
शरण मी आलो अति दीनवाणी ।
नरहरी श्री दे तव पदी थारा ॥ ५ ॥