छंद तुझा लागला, गं अंबाबाई नाद तुझा लागला ॥ धृ ॥
भरजरीचा शालू गं अंबे भरजरीचा शालू ।
कशाने चुरगळला, गं अंबाबाई पालखीचा भार पडला ॥ १ ॥
सव्वा मन गुगुळ अंबे सव्वा मन गुगुळ ।
आकाशी धुर गेला, गं अंबाबाई शंकर गुरु केला ॥ २ ॥
नवरत्नांचा चुडा गं अंबे नवरत्नांचा चुडा ।
कश्याने तडतडला, गं अंबाबाई सोंगट्यांचा डाव रंगला ॥ ३ ॥
सरज्याची नथ अंबा, सरज्याची नथ ।
कशाने ओली झाली, गं अंबाबाई पेल्याने दूध प्याली ॥ ४ ॥
बुट्टेदार शालू अंबा, बुट्टेदार शालू ।
कशाने मळविला, गं राती बाई परशूला खेळवीला ॥ ५ ॥
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं ।
शंकरासी अंबाबाई सारीपाठ खेळ गं ।
डाव कुणी जिंकला गं अंबाबाई ॥ ६ ॥
छंद तुझा लागला, गं अंबाबाई नाद तुझा लागला...
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .