दरबारी धावत ।
पायी घागऱ्या रुणुझुणुवाजती ।
आनंदे डोलत || धृ ।।
अष्टभुजा नारायणी |
लाल शालू हा नेसोनी ।
सिंहावरी स्वार होऊनी ।
झणझणकार करीत ।।१ ।।
किरीट कुंडल कुरळे केस ।
भाळी मळवट बिंदी घोस ।
मुखी तांबुल रंगला खास ।
विकट हास्य जोरात || २ ||
शक्ती चक्र गदा घेऊनी ।
खङग परीघ हाती असोनी ।
वरदहस्ते उभी भवानी ।
शंख वाजवी जोरात || ३ ||
सर्व भक्ता दर्शना देऊनी ।
संकटे त्यांची सर्व हरोनी ।
दशदिशा अवलोकुनी ।
हरी शरण अंबेसी ।।४ ।।