दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे

×

📿 सेवा बुकिंग / चौकशी फॉर्म

दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे |


कवड्याची माळ मी गळा घातली | 

आई रेणुकाईची आराधना केली  

दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे || १ ||


कोल्हापूर निवासिनी नाव तुझे अंबा । 

माहूरगडी वास करी शोभे जगदंबा

दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ।।२ ।। 



अष्टभूजा नारायणी हाती त्रिशूळधारी | 

महिषासूर मारून धरणी पाप मुक्त करी

दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे  || ३ || 



काम - क्रोध - मोह माया शत्रू आहे बा रे | 

आई अंबे कृपा करी नष्ट करी सारे 

दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे || ४ || 



माता - पिता तूच सारे कृपा करी आई । 

तूझ्या विण जनामध्ये आम्हा कोणी नाही 

दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे || ५ ||
 


मागणे हे आई तुला राखमाझी लाज | 

सुखी ठेव सर्वांना हीच विनंती आज 

दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे || ६ ||

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने