कोट्यावधी अपराध पतित मी | रेणुके सांभाळी गे मला | क्षमा प्रार्थना

कोट्यावधी अपराध पतित मी | 

शरण आलो तुला । 

आई गे सांभाळी गे मला | 

रेणुके सांभाळी गे मला ।। धृ .।। 



तुझी पूजा मी जाणत नाही । 

कैसे करू गे याला .. २ 

आई गे सांभाळी गे मला | 

रेणुके सांभाळी गे मला ।। १ ।। 



मंत्र यंत्र आणि तंत्रही नाही | 

माहीत नाही गे याला .. २ 

आई गे सांभाळी गे मला | 

रेणुके सांभाळी गे मला।। २ ।।



 गायनपण हे येतच नाही । 

आळवू कैसे तुला .. २ 

आई गे सांभाळी गे मला | 

रेणुके सांभाळी गे मला।। ३ ।। 



हरि विनवितो तुझीया चरणी । 

करुणा येऊ दे तुला..२ 

आई गे सांभाळी गे मला | 

रेणुके सांभाळी गे मला।। ४ ।।


Instant Article Tags



थोडे नवीन जरा जुने