तापत्रयानें मम देह तापला ।
विश्रांति कोणी न च देतसे मला ।
दैवें तुझें हे पद लाधले मला ।
दत्ता कृपासाउलि दे नमूं तुला ॥१ ॥
कामादि षडवैरि सदैव पीडिती ।
दुर्वासना अंग सदैव ताडिती ।
त्राता दुजा कोण नभेटला मला ।
दत्ता कृपासाउलि दे नमूतुला ॥२ ॥
देही अहंता जडली न मोडवे ।
गृहात्मजस्त्रीममता न सोडवे ॥
त्रित पदावानळ पोळितो मला ।
दत्ता कृपासाउलि दे नमूं तुला ॥३ ॥
अंगी उठे हा अविचार दुर्धर ।
तो आमुचे हे बुडवीतसे घर ॥
पापें करोनि जाळितो त्वरें मला ।
दत्ता कृपासाउलि दे नमूंतूला ॥४ ॥
तूंचि कृपासागर मायबाप तूं ।
तूं विश्वहेतू हरि पापताप तूं ॥
न तूजवांचूनि दयाळु पाहिला ।
दत्ता कृपासाउलि दे नमूं तुला ॥५ ॥
दारिद्रयदावें द्विज पोळतांतया ।
श्रीद्यावया तोडिसि वेल चिन्मया ॥
तया परि पाही दयार्द्र तूं मला ।
दत्ता कृपा साउलि ने नमूं तुला ॥६ ॥
प्रेतासि तूं वाचविसी दयाघना ।
काष्ठासि तूं पल्लव आणिसी मना ।
हे आठवी मी तरि जीव कोमला ।
दत्ता साउलि दे नमूं तुला ॥७ ॥
ह्या अष्टके जे स्तविती तयावरी ।
कृपा करी हात धरी तया शिरीं ।
साष्टांग घालूप्रणिप्रात बा तुला ।
दत्ता कृपासाउलि दे नमूं तुला ॥८ ॥
इति श्री . प . श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीगुरुदत्तात्रेयाष्टकं संपूर्णम् ॥