विपुल दयाघन गर्जे तव हृदयांबर श्रीरेणुके वो ।
पळभर नरमोराची करुणा वाणी ही आईके ।। धृ .।।
श्रमलीस खेळुनी नाचूनी गोंधळ घालूनि ब्रह्मांगणी वो ।
निजलिस कशी दीनाची चिंता सोडुनी अंतःकरणी वो |
उठ लवकर जगदंबे त्र्यैलोक्याची तू स्वामिनी वो ।
विधी हरी हर अज्ञानी पूर्ण ज्ञानी तू शहाणी वो ।
समर्थ परमेश्वरी तू अनंत ब्रह्मांड नायिके वो || १ ||
पळभर ।। धृ .।।
शरणागत मी आलो परि बहू चुकलो बहु बोलावया वो |
तुज जननीचे नाते लाज न वाटे लावावया वो |
परि तूं दिनांची जननी अनाथांची तुज बहु दया वो ।
हे श्रुति सत्य की असत्य अनुभव आलो मी पहावया वो |
कळेल तैसी करी परि निज ब्रीद रक्षी मम पालिके वो || २ ||
पळभर ।। धृ .।।
भवगदे पिडलो भारी मजला दुःख हे सोसेना वो |
अजुनी अंबे तुजला माझी करुणा का येईना वो |
तारी अथवा मारी धरिले चरण मी सोडीना वो |
कृपा केलियावाचुनी विन्मुख परतुनी मी जाईना वो |
तुजवीन जगी कोणाचे वद पद प्रार्थावे अंबीके वो || ३ ||
पळभर ।। धृ .।।
ऐकूनी करुणा वाणी ह्दयी सप्रेम द्रवली हो ।
प्रसनमुख जगदंबा अंबा प्रसन्न जाहली हो ।
अजरामर वर द्याया प्रगटुनी पुढे उभी राहिली हो ।
भक्तांकित अभिमानी विष्णुदासाची माऊली हो ।
जी निज इच्छा मात्रे सुत्रे हालवी कवतुके हो || ४ ||
पळभर ।। धृ .।।
कापराची ज्योत अंबे ओवाळु तुजला
लोलो लागला अंबेचा
जय जय जगदंबे श्री अंबे
जय जय भवानी मनरमणी
दुर्गे दुर्घट भारी तुजविण
आश्विन शुद्ध पक्षी अंबा (नवरात्री)
श्री सूक्तम्
छंद तुझा लागला
कोट्यावधी अपराध
आम्ही चुकलो जरी
अंबे एक करी
विपुल दयाघन गर्जे
संपूर्ण आरती संग्रह
आरती जगदंबे तुज
जय जय जगदंबे श्री
दे मज आशीर्वाद
माय माझ्या रेणुकेची दृष्ट
रेणुकाष्टकम्
अयि गिरिनन्दिनि
कनकधारा स्तोत्रम्