भगवती महा मंगलाईने ॥
आद्य ईश्वरी विश्व व्यापिके ॥
शरण तुज मी पाव रेणुके॥1॥
दिनवत्सले पाय दाखवी।
ञिपुर भैरवी या भवार्न्नवि॥
निववी ताप तु आनंद दाईके ।
शरण तुज मापाव रेणुके ।।2।।
परममुढ मी जाण निश्चय ॥
दुढ मला शिवे नामय ही जय ॥
प्रगट व्हावया ज्ञान दिपिके ॥
शरण तुज मी माय रेणुके ।।3।।
प्रपचंकारणी टाकले मला ॥
मार्ग चुकलो ध्यास हा तुझा ॥
तुझ कुपे विने भय कसे चुके ॥
शरण तुझ मी पाव रेणुके ॥4॥
विषय जाले हे चहु कडे आसे ॥
काम कोध हे व्याघ़ गर्जती॥
रक्षी संकटी भ्रांती नाशीके ॥
शरण तुज मी पाव रेणुके।।5।।
आश्रय नसे आणि का जनी ॥
बालकासी का टाकले वनी ॥
धाव घे कडे माय रेणुके ॥
शरण तुज मी पाव रेणुके।।6।।
हेची मागणे माझी या मानी ॥
हृदय ग्रंथी ही छेद योगीनी ॥
नुपेक्षी कदा भक्त पोशीके ॥
शरण तुज मी पाव रेणुके ।।7।।
श्रीदयानिदे त्रिपुर सुंदरी ॥
सर्व साक्षी तु भेट लवकरी ॥
गोसावी नंदन विनवी चंडीके ॥
शरण तुज मी पाव रेणुके।।8॥