आरती जगदंबे l तुज अंबे l
तारक विश्वकुटुंबे l जयजय जगदंबे ll धृ ll
प्रथम मुळारंभा l घट शोभा l
तोरण मखरस्तंभा l आरती जगदंबे ll १ ll
दुसरी ही पूजा l तुज ओझा l
ओवाळीन सुख काझा l आरती जगदंबे ll २ ll
लोकत्रय छंदा l आनंदा l
ध्यासी मानसवृंदा l आरती जगदंबे ll ३ ll
चवथी ही पूजा l तव तेजा l
नवरत्नांची शेजा l आरती जगदंबे ll ४ ll
पंचारती पाही l तुज आई l
सुंदर अंबाबाई l आरती जगदंबे ll ५ ll
षट्गुण संपन्न l अन्नपूर्णा l
देसी मंगल सदना l आरती जगदंबे ll ६ ll
सप्तेश्वर मेळी l रसभाळी l
नाना वाद्यरसाळी l आरती जगदंबे ll ७ ll
भाव बळे आता l घनदाटे l
उदारमुळं पीठे l आरती जगदंबे ll ८ ll
नवदिनी नवरात्र l शिवस्तोत्र l
स्थापून मंगल मंत्र l आरती जगदंबे ll ९ ll
दास तुझा ध्यायी l अंबा ही l
कुलदैवत मूळमाही l आरती जगदंबे ll १० ll
कापराची ज्योत अंबे ओवाळु तुजला
लोलो लागला अंबेचा
जय जय जगदंबे श्री अंबे
जय जय भवानी मनरमणी
दुर्गे दुर्घट भारी तुजविण
आश्विन शुद्ध पक्षी अंबा (नवरात्री)
श्री सूक्तम्
छंद तुझा लागला
कोट्यावधी अपराध
आम्ही चुकलो जरी
अंबे एक करी
विपुल दयाघन गर्जे
संपूर्ण आरती संग्रह
आरती जगदंबे तुज
जय जय जगदंबे श्री
दे मज आशीर्वाद
माय माझ्या रेणुकेची दृष्ट
रेणुकाष्टकम्
अयि गिरिनन्दिनि
कनकधारा स्तोत्रम्