जाने न मंत्र यंत्रा , जाने न तव स्तुती मी
आवाहना न जाने , ध्यानासी ना कधी मी
मुद्रा वीलाप नाही , परी ऐवढे समजते
तुज शरण येता आई . क्लेशास सर्व हरते
वाईट पुत्र जरी गे , वाईट माय नसते ।। १ ।।
कल्याण दायी तुझी , पुजा मला कळेना
मी आळशी दरीदी , विधीही मला कळेना
तव चरण सेवा करीता , सारेच माझे चुकते
करीशी क्षमा परी तु . हे ऐवढे समजते
वाईट पुत्र जरी गे , वाईट माय नसते ।। २ ।।
नाही तुझी मी केली . सेवा कधी ग आई
संपत्ती विपुल माते , आर्पिली तुजशी नाही
तरी ही तु माउली ग , अनुपमा प्रेम करीते
विसरुन सर्व माझे , पोटी मला तु धरीते
वाईट पुत्र जरी गे , वाईट माय नसते ।। ३ ।।
आयुष्य चालेले हे , आजुनी पुजा कळेना
हा जीव पातकी ग , कोणास आकळेना
सोडुन सर्व देवा , घरीले तुझ्या पदाते
आधार कोणी नाही . तुज शरण आलो माते
वाईट पुत्र जरी गे , वाईट माय नसते ।। ४ ।।
तव मंत्र पडता कानी , चांडाळ होई वक्ता
असला दरीद्री तरीही . श्रीमंत करीशी भक्ता
संपन्न निर्भय त्या . तव नामची करते
महात्म तव जपाचे , जाणील कोण माते
वाईट पुत्र जरी गे . वाईट माय नसते ।।५ ।।
लावुनीया चित्तेचे . ते भस्म सर्व अंगी
गरळास जो पिऊनीया , नागास धरितो अंगे
वस्त्रा विनाच राहे ज्याभोवती ती भुते
जगदीश म्हणती त्यासी , पत्नी तु म्हणुनी माते
वाईट पुत्र जरी गे वाईट माय नसते ।। ६ ।।
अंबे न केली पुजा उपचार विविध करुनी ,
केल्या अनंत गोष्टी वाईट या जीवची ,
थोडी जरी तु केली कृपा अनाथ नाथे ,
होईल योग्य हेचि तव लेकरु मी माते ,
वाईट पुत्र जरी गे , वाईट माय नसते ।। ७ ।।
नच वैभवास नेई . मोक्षासी ही न माते
विज्ञान सुख नको ग , इतुकेच देड़ माते
रुद्राणी शिव भवानी . मृडाणी मुखी असो दे
आयुष्य जाऊ देई . तव नाम जपता माते
वाईट पुत्र जरि गे , वाईट माय नसते ।। ८ ।।
मी संकटीच स्मरतो . तुजला महेश्वरी ग
म्हणुनी तु धुर्त मजला , जननी म्हणु नको ग
बालक भुके तुषार्त , आईस आळवीते
आई विना तयाला , कोणीच ना ग स्मरते ,
वाईट पुत्र जरी गे , वाईट माय नसते ।। ९ ॥
तुझी कृपाच आहे . परीपुर्ण मजवरी गे
नाहीच नवल काही . अपराधी मी जरी गे
कोणीही माय काय , सोडील लेकराते येऊनी
जननी जवळी , धरी या आता कराते
वाईट पुत्र जरी गे . वाईट माय नसते ।। १० ।।
माझ्या समान नाही , पापी कुणी जगी या
कोणी तारणार नाही . तुज वाचोनी जगी या
हे जाणुनी तु अंबे , करी योग्य वाटते ते
नाही तुझ्या विना ग , जगी कोणी यास माते
वाईट पुत्र जरी गे , वाईट माय नसते ।। ११ ।।
भजनासंबंधित माहिती ( Information )
वाईट पुत्र भजन हे एक भक्तिगीत आहे, ज्यात भगवती देवीला समर्पित केलेली पूजा आणि स्तुतीची महत्वाकांक्षा व्यक्त केलेली आहे.
या भजनामध्ये एक भक्ताचे भावनात्मक अभिव्यक्ती आहे, ज्यामुळे श्रद्धाळू त्या भावनांच्या सहारे भगवतीच्या शरणात येऊ शकतो.
या भजनात भक्तांनी देवी मातेच्या शरणात आलेले व त्याच्या आशीर्वादाने सर्व क्लेशांना हरवून जीवनात सुख-शांती प्राप्त करण्याची इच्छा केली आहे.
या भजनात व्यक्त केलेले भक्तीभाव अनुभवकर्षणीय आहे.
वाईट पुत्र भजनातील शब्द आणि संगीत सुंदरपणे समाहित केलेले आहे आणि त्यात भक्तांचं भावनात्मक समर्थन आहे.
ह्या भजनाचं श्रद्धाळूंनी सजवलेलं आणि भगवतीच्या पूजानंतर सुनावलेलं होईल, असं मानलं जातं.
या भजनाचं मौल्यांकन केल्यास त्यातील मुख्य मूळ भावनांचं अनुभव केलं पाहिजे.
वाईट पुत्र भजन हे संगीताच्या आणि भक्तिच्या क्षेत्रातील एक शिर्षकांतर भजन म्हणून मानले जाते.