दे मज आशीर्वाद |
अम्बे दे मज आशीर्वाद ।।धृ।।
माहूर गडच्या जगदंबेला ।
आतुरले मी तव दर्शनाला ।
तुझा ध्यास हा मनी लागला ।
तूच जननी अन् तात ।
अम्बे दे मज आशीर्वाद।। १ ।।
पूजनाची मी केली तयारी |
कोठे गुंतलीस सांग सुंदरी ।
वाट पाहते सारखी दारी ।
करोनि आरती वात ।
अम्बे दे मज आशीर्वाद।। २ ।।
बैसली स गे आसनावरती ।
सांग प्रार्थना करू कोणती ।
नयनी पाहता आनंद मूर्ती |
सुख वाटे मज त्यात ।
अम्बे दे मज आशीर्वाद।। ३ ।।
एका जर्नादनी पूर्ण कृपेने ।
भक्त गर्जति अति प्रेमाने |
धावत येई तू ग साजने ।
ठेवी मस्तकी हात |
अम्बे दे मज आशीर्वाद ।। ४ ।।