अनादी निर्गुणी निर्गुणी प्रगटली भवानी (जोगवा ) ॥

अनादी निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी । 

अहं महिषासूर महिषासुर , मर्दना लागुनी । 

त्रिविध तापाची तापाची करावया झाडणी । 

भक्ता लागी तू लागी तू पावशी निर्वाणी । 

आईचा जोगवा , जोगवा जोगवा मागेन || १ |
 

द्वैत सांडूनी सांडूनी माळ मी घालीन । 

हाती बोधाचा , बोधाचा झेंडा मी घेईन | 

भेदरहीत रहीत वारीसि जाईन ।

आईचा जोगवा , जोगवा जोगवा मागेन ।।२ ।। 


पूर्ण बोधाची , बोधाची घेईन मी परडी । 

आशा तृष्णेच्या , तृष्णेच्या पाडीन मी दरडी । 

मन विकार , विकार करीन कुरवंडी । 

विवेक रसाची , रसाची करीन मी दुरडी ।

आईचा जोगवा , जोगवा जोगवा मागेन ।।३ ।। 


नवविध भक्तीच्या , भक्तीच्या करूनिया नवरात्रा | 

पोटी मागेन , मागेन , ज्ञानरूपी पुत्रा ।। 

जाणूनी सद्भाव अंतरीच्या मित्रा | 

दंभ संसारा , संसारा मारीला कुपात्रा । 

आईचा जोगवा , जोगवा जोगवा मागेन|| ४ || 


आता साजणी , साजणी झाले मी निःसंग । 

विकल्प नवऱ्याचा , नवऱ्याचा तोडीयला संग | 

काम क्रोधादि , क्रोधादि झोडियले भांग | 

केला मोकळा , मोकळा मार्ग मी सुरंग ।  

आईचा जोगवा , जोगवा जोगवा मागेन।।4 ।। 


ऐसा जोगवा , जोगवा मागुनी ठेवियला | 

जाऊनी महाद्वारी , महाद्वारी नवस म्यां फेडिला । 

एका जनार्दनी , जनार्दनी एकपणे देखिला | 

जन्म मरणाचा , मरणाचा फेरा मी चुकविला । 

आईचा जोगवा , जोगवा जोगवा मागेन || ६ ||

Instant Article Tags
थोडे नवीन जरा जुने