अंबे एक करी उदास न करी | माते तुझे ध्यान आम्हास राहो


अंबे एक करी उदास न करी भक्तासी हाती धरी । 

विघ्ने दूर करी स्वधर्म उदरी दारिद्र्य माझे हरी ।। 

चित्ती मूर्ति बरी वरा भयकरी ध्यातो तुला अंतरी ।। 

वाचा शुध्द करी विलंब न करी पावे त्वरे सुंदरी ।।१ ।। 


माते एकविरे  वरा भय करे दे तू दया सागरे ।। 

माझा हेतु पूरे  मनात न उरे संदेह माझा हरे ।। 

जेणे दुःख सरे कुबुद्धि विसरे ब्रह्मैक्यधी संचरे ।। 

देई पूर्णकरे भवांबुधि तरे ऐसे करावे त्वरे ।।२ ।। 


अनाथासी अंबे नको विसरु वो । 

भवः सागरी सांग कैसा तरु वो ।

अन्यायी मी हे तूझे लेकरु वो | 

नको रेणुके दैन्य माझी करु वो ।।३ ।। 


मुक्ताफले कुंकुम पाटलांगी | 

सन्ध्येव तारानिकरे विभाती । 

श्रीमूळपीठा चल चूडिकाया । 

तामेंकवीरा शरणं प्रपद्ये ।।४ ।। 

सखे दुःखीताला नको दुःखवु वो । 

दिना बालकाते नको मोकलू वो । 

ब्रिदा रक्षि तू आपुल्या श्री भवानी । 

ही प्रार्थना ऐकुनि कैवल्यदानी ।।५।।


माते तुझे ध्यान आम्हास राहो | 

तुझे नाम आमुचे मुखास येवो ।
 
माते तुझे आम्ही दासानुदास | 

नमस्कार माते तुझ्या चरणास ।। 


जगदंब जगदंब ऐसे म्हणावे | 

देहातीत होवोनि जावे | 

स्वानंदसाम्राज्य भोगावे | 

समाधीस्थिती ।। 


काय मागू अंबाबाई । 

मागणे लई नाही  | 

संत सेवा घडो । 

मुखी नाम जडो । 

दर्शन तुझे घडो अंबाबाई ।।


👇लोक हे ही पाहतात ( अवश्य पहाच ) 👇



हे भोळ्या शंकरा | आवड तुला बेलाची


जरा डमरु बजाओ शिवशंकर मै पुजा करने आया हु


नित्य असो दे चरणासी दे मज आशिष तू आई 


जय परात्परे पुर्ण चिन्मये | शरण तुझ मी पाव रेणुके|  रेणुकाष्टक | 


छंद तुझा लागला, गं अंबाबाई नाद तुझा लागला


माय माझ्या रेणुकेची दृष्ट काढु या हो दृष्ट काढु या | देवीची दृष्ट 


 ऊठ अंबे तू , झोपी नको जाऊ | रेणुका देवीचे अष्टक


आली भवानी भक्तासाठी । दरबारी धावत


कोट्यवधी अपराध पतित मी | रेणुके सांभाळी गे मला | क्षमा प्रार्थना


दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे |


अंबे एक करी उदास न करी | माते तुझे ध्यान आम्हास राहो 


जाने न मंत्र यंत्रा | वाईट पुत्र जरी गे , वाईट माय नसते


 देवी सुरेश्वरी भगवती गंगे | जय जय गंगे नमो नमो


अनादी निर्गुणी निर्गुणी प्रगटली भवानी (जोगवा ) ॥


दे मज आशीर्वाद | अम्बे दे मज आशीर्वाद


आम्ही चुकलो जरी तरी काही तूं चुकू नको अंबाबाई 


माते तुझे ध्यान आम्हास राहो | अंबे एक करी उदास न करी 


पुष्पांजली अर्पितसे तुज दयाघना । पुष्पांजली (दत्त भजन)


तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी | श्रीदत्तस्तुति मराठी 


नमस्कार माझा श्रीदत्तात्रयासी | दत्त स्तोत्र मराठी 


गुरु हा संतकुळींचा राजा । श्रीगुरुमहिमा (दत्त भजन)


विसरूं कसा मी गुरुपादुकाला | श्रीगुरुपादुकाष्टक मराठी 


 दत्ता कृपासाउलि दे नमूं तुला । श्रीगुरुदत्तात्रेयाष्टकम्




( Stotra, Arati, Mantra, Articles, PDF Library and more...)
थोडे नवीन जरा जुने